1/12/2009

मोहोरसुगंधी

दिठी-दिठी तुझे भास

स्पर्ष मोहोरसुगंधी

सायवाळल्या ओठांना

आर्त अनोखी धुंदी...

आरस्पानी

स्वप्न डोहाच्या तरंगी
तुझे भास आरस्पानी
चंद्राच्या कुशीत मिटली
एक अबोल चांदणी...

चांदणभूल

सरू नये आज निशा
स्वप्नी येता तुझी चाहूल
मोहरल्या दाही दिशा
की ही नवी चांदणभूल ?

1/09/2009

प्राजक्त मला गवसलेला . . . माझ्या अंगणातला . . .

आकाशीचं चांदण
लेऊनअंगणातला प्राजक्त
सारं देणं धरतीला देऊन
पुन्हा एकदा विरक्त . . .


माझ्या अंगणात बरसलेला
मुक्या प्राजक्ताचा बहर
सार्‍या चांदण्याच दुरावल्या
असा आकाशाचा कहर . . .


सजून येईल निशा

प्राजक्त वेडा फुलेल

चांदण्यांची मधूशिंपण

पुन्हा धरेवर घालेल . . .

11/10/2008

सुपा एवढे कान ... सुपात दिसतात छान...

परवा असंच काहीबाही खरेदीला गेलो होतो मार्केटला तेव्हा ही छोटीशी सुपं दिसली आगदीच ओंजळी एव्हढी छोटीशी.  घेऊन आले पटकन.  गणपती बाप्पा तर माझा खूपच आवडता. मग काय सिरामिक क्ले ने लहान लहान बाप्पा बनवले आणि त्यांना बसवलं छोटुकल्या सुपात. आणि छानश्या रंगांनी रंगवलं.

सुपाएवढे कान सुपात दिसताहेत ना छान ?

हे सगळे गणपती  अगदी छोटे २-३ इंचाचे आहेत.

हा आपाल्या सगळ्यांचा आवडता बालगणेश.. पार्वती मातेच्या स्नान गृहाबाहेर पहारा देणारा चिमुकला द्वारपाल.


















हा बघा थोडासा जवळून. 



'कधी मोदकाचं ताट येतंय माझ्याकडे आणि कधी मी ते फस्त करतोय' असंच म्हणत असेल ना हा ?
मला तर असंच वाटतंय!


आणि हा अजून एका सदैव आपल्यावर वरदहस्त ठेवणारा

लेकाच्या हट्टाखातर त्याला बनवून दिलेला हा बाल हनुमान