6/23/2008

गणपती म्युरल

गणपती बाप्पा मोरया !


एम सील वापरून मी स्वत: बनवलेले हे गणपती म्युरल आज मी इथे शेअर करतेय.


हे म्युरल बनवण्यासाठी साधारण दिड फुट आकाराच्या हार्ड्बोर्ड्वर जास्वंदाच्या फुलाची आउट्लाईन काढून तो त्या आकारात कापुन घेतला. मग एमसील घट्ट मळून  त्याचे हात पाय पोट सोंड वगैरे एकेक आकार बनवून त्यांची हार्ड्बोर्डवर मध्यभागी निट मांडणी केली. बाप्पाचा सर्वांग सुंदर प्रमाणबद्ध आकार बनवून घेतला. नंतर सगळे नाजूक काम केले. एम सील च्या बारीक वातीसारख्या दोर्या वळून बाप्पाचे दागिने माळा, हातातली कडी, मुकुट वगैरे बनवले. जिथे गरज वाटेल तिथे सुई किंवा चाकू वापरून नक्षी तयार केली. आणि हलक्या हाताने चिकटवून दिले. एम सील स्वत:च एक सिलण्ट  आहे त्यामुळे ते चिकटवण्यासाठी फ़ेव्हीकोल किंवा दुसरे काही वापरण्याची गरज नसते. बापाचे सगळे काम पूर्ण झाल्यावर खालच्या बाजूला एका रिकाम्या पाकळीवर उंदिरमामा आणि मोदकपात्र ठेवले. सगळे एम सील चे मातीकाम सुकायला एक पूर्ण दिवस लागतो.


 


हा गणपतीबाप्पा दुसऱ्या दिवशी कडकडीत वाळल्यावर  आवडत्या रंगांनी रंगवला. रंगावर ग्लॉसी फ़िनिशींग येण्यासाठी रेझिन चा एक कोट दिला.

 

6/20/2008

की स्टँन्ड्स

फार वर्षांपुर्वी मी सिरॅमिकच्या काही वस्तु बनवल्या होत्या.
टाईमपास म्हणून सध्या पुन्हा नव्याने काहीतरी करुया म्हणत माती वळून ह्या सुन्दर वस्तु तयार झाल्या.. आणि आता मला पुन्हा ह्या छंदाने वेड लावले....
सिरॅमिक पावडर आणि गम वापरून हार्ड बोर्ड च्या कट आउट्स वर हे काम केले आहे. त्यालाच छोटेसे हुक्स लावले आणि बनवले हे सुंदर की -स्टँन्ड्स किल्ल्या अडकवण्या साठी.

हे बाप्पा आराम करत आहेत



बापरे केव्ह्ढी ती फळं

मुखवटे आणि चेहरे