लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मारी बिस्किटे २०० ग्रॅम
ड्रिंकिंग चॉकलेट १००ग्रॅम
पिठीसाखर ४०० ग्रॅम
डेसिकेटेड खोबरे १०० ग्रॅम
लोणी ३० ग्रॅम
क्रमवार पाककृती:
- मारी बिस्किटांचा मिक्सर मध्ये चुरा करुन घ्या व बारीक चाळणीने चाळुन घ्यावा.
- बिस्कीटाच्या चुर्यात ड्रिंकिंग चॉकलेट, अर्धी पिठीसाखर व लागेल तसे दुध घालून कणकेसारखे मळुन गोळा करुन ठेवा.
- पोळपाट व लाटण्याला तुपाचा हात लावुन गोळा पोळीसारखा लाटुन घ्यावा.
- लोणी, उरलेली पिठी साखर व डेसिकेटेड खोबरे एकत्र करुन तयार करुन त्या लाटलेल्या पोळीवर सर्वत्र एकसारखे लावावे.
- मग पोळीचा रोल करुन फ्रीज़ मधे गार करण्यास ठेवावे.
- १ तासाने बाहेर काढुन हव्या त्या मापाच्या जाडसर वड्या कापाव्यात. झटपट स्विस रोल तय्यार.
वाढणी/प्रमाण:
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा:
लहान मुलांसाठी बनवताना आणखी लहान आकाराचे बनवता येईल.
बच्चा पार्टी असेल किंवा अचानक कुणी येणार असेल तर झटपट करता येण्यासारख्या आहेत.
No comments:
Post a Comment