Similar recipe of Instant Dark Chocolate cake
कधी कधी असं होतं की केक तर बनवायचाय पण घरात सगळं साहित्य नाहीये हाताशी अश्यावेळी ही झटपट आणि सोप्पी रेसिपी उपयोगी पडते.
कधी कधी असं होतं की केक तर बनवायचाय पण घरात सगळं साहित्य नाहीये हाताशी अश्यावेळी ही झटपट आणि सोप्पी रेसिपी उपयोगी पडते.
साहित्य अगदी सहज उपलब्ध असणारे आहे.
बघुया काय काय घेतलंय …
ओरिओ बिस्किट्स २ पॅकेट्स
पार्ले जी बिस्किट्स १ पॅकेट्
१ कप दुध
१ टेबलस्पून बटर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा आणी १/२ टीस्पून बेकिंग पावडर
सोप्प्या केकची कृती खरंच खूपच सोप्पी आहे .
सर्वप्रथम ओरिओ बिस्किट्स थोड्यावेळाकरीता फ़्रिजमध्ये ठेउन द्या. असे केल्याने त्यावरील क्रीम काढणे सोप्पे जाते. मग बिस्किट्स बाहेर काढून चमच्याने त्यावरील सगळे क्रीम काढून घ्या. हे क्रीम १ कपभर दुधात मिक्स करून बाजूला ठेवून द्या.
आता ओरीओ आणि पार्ले बिस्किट्स चा मिक्सरमध्ये चुरा करून पावडर करून घ्यायची मग त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा प्रत्येकी १/२ (अर्धा ) टीस्पून घालून बिस्किट्स चा सुरा चाळणीने चालून घ्या.
मग त्यात क्रीम मिसळलेले गोड दुध (१ कप) मिसळा. बेटर ची कन्सिस्टसी पळी वाढी असायला हवी.
ओव्हन 350 F ला प्रीहीट करून घ्या. केक च्या भांड्याला ग्रिसिंग करून त्यात मिश्रण घालून २० ते २५ मिनिटे बेक करा.
टूथपिक टोचून बघा जर काडीला काही लागले नसेल तर केक चांगला बेक झाला आहे.
अर्ध्या तासात मस्त केक होतो. जरा गार झाल्यावर हव्या त्या आकारात कापून त्यावर चोकलेट सिरप किंवा व्हिप क्रीम टाकून थोडीशी सजावट करून सर्व्ह करा. बच्चेकंपनी एकदम खूष.
वाफ़ाळत्या चहासोबत नुसता केक खूप मस्त लागतो.
No comments:
Post a Comment