
दूरून बघतानाही खूप छान वाटत होतं.

तळ्याजवळून

पिरॅमिडकडे जाणार्या मुख्य वाटेवर असलेला हा ध्यानस्थ बुद्ध

हिरव्या वनराईच्या मध्ये असलेला पिरॅमिड

हा पिरॅमिड म्हणजे जगातील सर्वात मोठ्ठं मेडीटेशन सेंटर आहे. १६० फुट बाय १६० फुट एवढा बेस एरिया असून ह्याची उंची साधारण दहा मजली इमारती एवढी आहे. ह्या मैत्रेय-बुद्धा पिरॅमिड मेडीटेशन सेंटर मध्ये साधारण ५००० लोक सहज मावतिल एवढी जागा आहे. पिरॅमिडच्या बाहेरच्या बाजूला सुंदर म्युरल्स आहेत.
ह्याचे ओरीएन्टेशन दक्षिणोत्तर असून Giza Pyramid च्या प्रिन्सिपल्स प्रमाणे ह्याचे बांधकाम केले आहे. ह्या पिरॅमिड्च्या कामामध्ये हिमालयामधले ६५० क्रिस्टल्स वापरले आहेत असे तिथे माहिती सांगणार्या एका काकांनी सांगितले.
पिरॅमिड म्हणजे ऊर्जेचं घर. पिरॅमीड मध्ये त्याच्या भौमितिक रचनेमुळे उर्जा एकत्रित करून साठवली जाते. पण असंही म्हणतात की पिरॅमिड मनावरचा ताण तणाव आणि थकवा घालवू शकतात. ह्या पिरॅमिड मध्ये जर ध्यानधारणा - मेडीटेशन केलं तर ते नेहमीच्या मेडीटेशन पेक्षा तिप्पट प्रभावी ठरतं. तसाच हा मेडीटेशन पिरॅमिड. ह्या ठिकाणी गेल्यावर तिथे असलेल्या लोकांचे अनुभव ऐकून असे समजले कि इथे आत वर किंग्ज्स चेंबर्स ला जाउन ध्यानधारणा केली तर संपूर्ण शरीराचा थकवा निघून जाउन, शरिराचे शिथीलीकरण होउन मनात कसलेही विचार येत नाही. खुप प्रसन्न शांत वाटतं. तर कुणी संगितलं की समाधी अवस्थेत थोड्या वेळाने एका साधकाला स्वतःला हातच नाहियेत असाही भास झाला होता.
आत जाण्यासाठी अतिव उत्सुकता होती. इजिप्तचे पिरॅमिड बघायचा योग कधी येतो ते माहीत नाही. मग इथे काय आहे ते जाणून घ्यायचे होते. आत प्रवेश करण्यापूर्वी अनेक सुचना लिहिलेला कागद आमच्या हाती दिला गेला. आणि सांगितले. की आत आवाज करायचा नाही अगदी पाउलंही वाजवायची नाहीत. तुम्ही मेडीटेशन करणार असाल तरच आणि अर्ध्या तासाहून अधीक काळ करणार असाल तरच तुम्हाला वर किंग्ज्स चेंबर्स वर जायला मिळेल. मी हो म्हण्टलं. मग त्यांनी मेडीटेशन साठी कश्या पोज मध्ये बसायला पाहिजे ते सांगितले. सर्व सुचना समजल्या वर मी आत गेले.
आत प्रवेश केल्यावर उजवीकडे आणि डावीकडे अशी दोन दालने दिसली. एकेक करून दोन्ही बघुन घेतली. दोन्ही दालनांमध्ये ध्यानधारणेच्या वेगवेगळ्या अवस्था दर्शवणार्या झोपलेल्या बुद्धाची, समाधीस्थ, ध्यानस्थ बुद्धाची अतिशय सुंदर मोठ्ठी वॉल म्युरल्स आहेत. :)
इथे आत फोटूगिरीला मनाई होती. मग थोड्या पाहिर्या चढून गेल्यावर वर भरपूर मोकळी जागा होती. तुरळक ठिकठिकाणी काही लोक समाधी लाउन बसले होते. काही ठिकाणी खुर्च्याही दिसल्या. पण खरा लक्षवेधी होता तो मध्यभागी असलेला गोलाकार (स्पायरल )वर जाणारा जिना. हाच तो किंग्ज चेंबरचा भाग. पिरॅमिडच्या मध्यभागी साधारण १/३ पट उंचीच्या ह्या भागाला किंग्ज चेंबर म्हणतात. ३४ फुटांवर असलेल्या हा भाग पिरॅमिडमधील सर्वात जास्त उर्जा असणारा (मोस्ट एनर्जीटीक) भाग आहे. तिस चाळिस लोक एका वेळी बसू शकतिल इथे.
मी वर गेले तेव्हा आधीच १०-१२ जण ध्यान लाउन बसले होते. मग मीही आधी सुचना दिल्या प्रमाणे (डोळे मिटून पाय पसरून एका पायवर दुसरा पाय चढवून म्हणजे आपण ज्याला अढी घालणे म्हणतो तसे) थोडा वेळ बसले. खूप प्रसन्न ... रिलॅक्स.. शांत वगैरे वगैरे खरंच वाटत होतं !मग कदाचित विस एक मिनिटे झाली असतिल.. काय झाले माहीत नाही...नंतत मला बसणे अशक्य झाले.. नक्की काय होत होते माहित नाही.. मला दरदरून घाम फुटला होता... म्हणून मी उठून खाली आले आणि आश्चर्य म्हणजे खाली पिरॅमिड बाहेर तर मस्त गारवा होता आभाळ भरून आलं होतं.
इथे सनसेट नाही अनुभवता आला :( नेक्स्ट टाईम !!!

इथे अधिक माहिती आहे आणि सुंदर फोटोज सुद्धा