लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
८-१० मोठ्या पोपटी हिरव्या मिर्च्या
३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून
लाल मिर्ची पावडर,
गरम मसाला पावडर,
आमचूर पावडर,
चाट मसाला,
कोथिंबीर धूउन बारिक चिरून
मीठ
बेसन पीठ
चिमुट्भर खा. सोडा
३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून
लाल मिर्ची पावडर,
गरम मसाला पावडर,
आमचूर पावडर,
चाट मसाला,
कोथिंबीर धूउन बारिक चिरून
मीठ
बेसन पीठ
चिमुट्भर खा. सोडा
क्रमवार पाककृती:
- मिर्च्यांचे देठ न काढता मिर्चीला मधे चीर देउन बिया काढून थोड्या मिठाच्या पाण्यात टाकून ठेवाव्यात.
- बटाटे सोलून किसून किंवा मॅश करून त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, चिमूट्भर आमचूर पावडर, मिठ, चिरलेली कोथिंबीर, सर्व मसाले एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे.
- मिर्च्या पाण्यातून काढुन घेउन निथळून त्यात वरिल प्रमाणे तयार केलेले सारण गच्च भरावे.
- एका भांड्यात बेसन, चविपूरते मीठ, चिमूट्भर सोडा घालून भजीसाठी भिजवतो त्या प्रमाणे पण थोडे घट्टसर पिठ भिजवावे.
- कढईत तेल चांगले तापवून मग मध्यम आचेवर बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवून मिर्च्यांचे वडे तळावेत.
- चिंच खजूराच्या गोडसर चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावेत.
वाढणी/प्रमाण:
खाउ तसे
अधिक टिपा:
- मिर्च्या घेताना कडक ताज्या मोठ्या घ्याव्यात. मोठ्या मिर्च्या कमी तिखट असतात.तशीही ह्या मिर्च्यांना खास चव नसते. म्हणूनच सारणात लाल तिखट आणि गरम मसाला दोन्ही वापरावे.
- देठ न काढता मिर्च्या तश्याच ठेवल्याने तळताना सोप्पे जाते.
- बेसन पिठात शक्यतो तिखट किंवा हळद घालू नये. तळल्यावर काळपट दिसतात.चविसाठी ओवा-जिरा पूड वापरू शकता.
- हे वडे मध्यम आचेवर तळल्याने एक्दम खमंग होतात.
- पार्टीसाठी वेरिएशन म्हणून बेसनाच्या बॅटर मधून बुडवून मग भिजवलेल्या साबुदाण्यात घोळवले की मोतिया भजी सारखे दिसायला सुंदर दिसतात. व वर चिकटलेल्या साबुदाण्यांमुळे छान लागतात.
No comments:
Post a Comment