माझ्या घराजवळच्या लायब्ररी मागे एक सुंदर तळं आहे. सूर्यास्ता पुर्वी संध्याकाळी तिथे रेंगाळत तळ्यातल्या बदकांचे खेळ बघत टाईमपास करायचा मला हल्ली छंदच लागलाय. ह्या एकाच तळ्यातल्या बदकांचे आणि त्यांच्या सुरेख पिल्लांचे वेगवेगळ्या वेळी घेतलेले हे फोटोज… फोटोवर टिचकी मारली की मोठे फोटो दिसतील :)
हेच ते सुंदर तळं… खरच आहे की नाही छान ?

हम दो … और हमारे…. बाराह !!!

पिल्लांची आई भोवती लगबग
आई मी काय खाऊ गं ? ए आई ही बघ आमचे फोटो काढतेय… आई चल आपण तिकडे जाऊ या…
ए मला पण आई जवळ जायचय… अरे बाबा कुठेय ?

पुन्हा एकदा सहपरिवार
तो सर्वात मागे दिसतोय ना तो वेडा बदक्या का कुणास ठाउक ह्या परिवाराला त्रास देत होता.
ह्या पिल्लांच्या बाबा बदकाला फड्फड उडून क्वॅक क्वॅक करून टोचायचा.. की लगेच बदकी आणि एखादं धिटूकलं बाळंही उलट प्रतिकारात्मक प्रहार केल्यासारखे त्याच्या अंगावर धावायचे. मग पुन्हा आपले लगबगीने सहपरीवार दुसर्या किनार्याकडे.. इकडे तिकडे...कारंजाभोवती.... फिरत होते... टूबूडुबू.. क्वॅक क्वॅक... तासभर तेच नाटक चालले होते.

संधिप्रकाशात अजून जे सोने ?

अंधारून आलं … चला बाळांनो पटकन घरी परतायला हवं !

No comments:
Post a Comment