चवडे ... वेगळंच नाव आहे ना मंडळी.. अहो पण हे चवडे म्हणजे आपल्या चिरोटे आणि खाज्यांचे भाउबंद.. भरकन काहीतरी गोड आणि वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर हे खुसखुशीत चवडे नक्कीच करून बघा.
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
२ वाट्या मैदा,
२ चमचे बारिक रवा,
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन
चिमुट्भर मिठ
अर्धी वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी डाळं(फुटाणा डाळ्/पंढरपुरी डाळं) पिठ करुन.
चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड
तळण्यासाठी तुप किंवा तेल

क्रमवार पाककृती:
२ वाट्या मैदा, २ चमचे बारिक रवा, चविपुरते चिमुट्भर मिठ आणि चमचाभर पिठीसाखर व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.
चार चमचे तेल कडकडित गरम करुन हे मोहन मैद्यात घालून जरुरीप्रमाणे थंड पाणी घालून घट्टसर पिठ मळावे. करंज्यांसाठी करतो तसा घट्ट गोळा करून तासभर झाकून ठेवावे.
वाटीभर डाळं मिक्सर मध्ये बारिक करून पिठीसाखरे सारखे बारिक पिठ करावे.
मग पिठी साखर आणि हे डाळ्यांचं पिठ एकत्र करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड मिसळावी.
तळणासाठी तेल किंवा तुप तापत ठेवावे.
मग मैद्याच्या पिठाचे पेढ्या एवढ्या आकाराचे एकसारखे गोळे करुन घ्यावे.
**फुलक्या एवढी किंवा जरा लहान एक पातळ पुरी लाटावी, मिडीयम हाय वर तळून ताटात काढावी, लगेच त्यावर चिमटीने साखर आणि डाळ्यांची पिठी भुरभुरावी, चमचा आणि झार्याच्या सहाय्याने पटकन अर्धी घडी करावी, पुन्हा साखर पिठी भुरभुरून पुन्हा पटकन घडी करावी. (आपण पोळी ज्याप्रकारे घडी करतो तश्या ह्या दोन घड्या कराव्यात).**
पुन्हा दुसरी पुरी... सगळी प्रोसेस पुन्हा .. असं करत सगळे चवडे बनवावेत.
हे बघा हे असे दिसतील चवडे..

वाढणी/प्रमाण:
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा:
** हे काम अत्यंत पटापट करायचे आहे.
पुरी ताटात काढली की गॅसची आच कमी करणे.
पुरीवर एका हाताने साखर + पिठी भुरभुरावी.
लगेच मग हात भाजू नये म्हणून एका हातात चमचा आणि दुसर्या हातात झारा घेउन पटकन फोल्ड करावी. (जरासा उशिर झाला तर पुरी मोडते.)
एकटीने करायला भरपूर मारामारी होईल.. मदतनिस असेल तर साखर पेरणी किंवा तळणी एकेकाने करता येईल.
थोडीशी तळणा नंतरची कृती किचकट आणि नाजूक असली तरी करंज्यां पेक्षा अगदी सोप्पी आहे.
ह्या चवड्यांची चव त्या साखर + डाळ्यां मुळे अप्रतिम येते.

No comments:
Post a Comment