परवा असंच काहीबाही खरेदीला गेलो होतो मार्केटला तेव्हा ही छोटीशी सुपं दिसली आगदीच ओंजळी एव्हढी छोटीशी. घेऊन आले पटकन. गणपती बाप्पा तर माझा खूपच आवडता. मग काय सिरामिक क्ले ने लहान लहान बाप्पा बनवले आणि त्यांना बसवलं छोटुकल्या सुपात. आणि छानश्या रंगांनी रंगवलं.
सुपाएवढे कान सुपात दिसताहेत ना छान ?
हे सगळे गणपती अगदी छोटे २-३ इंचाचे आहेत.
हा आपाल्या सगळ्यांचा आवडता बालगणेश.. पार्वती मातेच्या स्नान गृहाबाहेर पहारा देणारा चिमुकला द्वारपाल.
'कधी मोदकाचं ताट येतंय माझ्याकडे आणि कधी मी ते फस्त करतोय' असंच म्हणत असेल ना हा ?
मला तर असंच वाटतंय!
आणि हा अजून एका सदैव आपल्यावर वरदहस्त ठेवणारा
लेकाच्या हट्टाखातर त्याला बनवून दिलेला हा बाल हनुमान
सुपाएवढे कान सुपात दिसताहेत ना छान ?
हे सगळे गणपती अगदी छोटे २-३ इंचाचे आहेत.
हा आपाल्या सगळ्यांचा आवडता बालगणेश.. पार्वती मातेच्या स्नान गृहाबाहेर पहारा देणारा चिमुकला द्वारपाल.
हा बघा थोडासा जवळून.
'कधी मोदकाचं ताट येतंय माझ्याकडे आणि कधी मी ते फस्त करतोय' असंच म्हणत असेल ना हा ?
मला तर असंच वाटतंय!
आणि हा अजून एका सदैव आपल्यावर वरदहस्त ठेवणारा
लेकाच्या हट्टाखातर त्याला बनवून दिलेला हा बाल हनुमान
No comments:
Post a Comment