सौथैंडियन इडली ही आता आपल्या रोजच्या नाश्त्याचा भाग जरी नसली तरी संडे स्पेशल नक्कीच आहे. ज्या लोकांना मधुमेहामुळे किंवा इतर कुठल्या पथ्यामुळे तांदूळ कमी खायचे असतात अश्या लोकांना ही रवा इडली एक मस्त ऑप्शन आहे. गव्हाचा रवा वापरल्याने ह्या इडल्या अतिशय हेल्दी तसेच सोबत भरपूर भाज्या घातलेले सांबार बनवले की मस्त आणि पोटभरीचा नाश्ता होतो.
लागणारे जिन्नस:
रवा २ वाट्या (उपम्यासाठी वापरतो तो गव्हाचा मध्यम जाडसर रवा)
उडीद डाळ १ वाटी
तेल १ छोटा चमचा
मिठ चविप्रमाणे
खायचा सोडा ऐच्छीक ( गरज वाटलीच तर)
उडीद डाळ १ वाटी
तेल १ छोटा चमचा
मिठ चविप्रमाणे
खायचा सोडा ऐच्छीक ( गरज वाटलीच तर)
क्रमवार पाककृती:
- २ वाट्या रवा (उपम्यासाठी वापरतो तो जाडसर रवा) बंद डब्यात ठेऊन कुकरमध्ये कोरडाच वाफवून घ्यायचा. ( मी वरणभाताच कुकर लावतानाच रव्याचा डबा पण ठेवते)
- १ वाटी उडद्डाळ साधारण चार तास भिजवून वाटून घ्यायची. पाणी फार वापरायचे नाही.
- रवा थोडा थंड झाल्यावर पाण्याने धूउन घेउन वाटलेल्या डाळीत मिक्स करायचा. असा रवा वाफवून नंतर धूउन घेतल्याने हलका होतो.
- चविपुरते मिठ घालून बॅटर रात्रभर (किंवा सहा सात तास) ठेउन द्यायचे. मस्त पिठ फुगते.
- इडल्या करण्याआधी एक चमचा तेल आणि एक चमचा पाणी मिक्स करून ते त्या बॅटर मध्ये घालून इडल्या बनवायच्या. मस्त स्पॉन्जी जाळिदार इडल्या होतात.
वाढणी/प्रमाण:
मध्यम आकाराच्या वाटीच्या प्रमाणात २२-२४ इडल्या होतात.
अधिक टिपा:
इडलीचे पिठ चांगले फुगून येण्यासाठी ...
उडिद डाळ वाटताना जास्त पाणी वापरायचे नाही.पण डाळ भिजवलेले पाणी फेकुन न देता रवा मिक्स करून बॅटर तयार करताना वापरायचे. म्हणजे पिठ छान येते ( फुगते/ आंबते).
पिठ पळीवाढे असावे. म्हणजे सहा सात तासानी चांगले फुगते.
वाटीभर भात( उरलाच असेल आणि संपवायचा असेल तर) वाटून ह्या पिठात मिक्स केला तरी चालतो.
काहीवेळा थंडीमुळे पिठ आले नाही किंवा इडल्या लवकर बनवायच्या असतिल तर चिमुट्भर सोडा चमचाभर पाणी आणि चमचाभर तेल मिक्स करून पिठात घालायचे.