गणपती बाप्पा मोरया !
एम सील वापरून मी स्वत: बनवलेले हे गणपती म्युरल आज मी इथे शेअर करतेय.
हे म्युरल बनवण्यासाठी साधारण दिड फुट आकाराच्या हार्ड्बोर्ड्वर जास्वंदाच्या फुलाची आउट्लाईन काढून तो त्या आकारात कापुन घेतला. मग एमसील घट्ट मळून त्याचे हात पाय पोट सोंड वगैरे एकेक आकार बनवून त्यांची हार्ड्बोर्डवर मध्यभागी निट मांडणी केली. बाप्पाचा सर्वांग सुंदर प्रमाणबद्ध आकार बनवून घेतला. नंतर सगळे नाजूक काम केले. एम सील च्या बारीक वातीसारख्या दोर्या वळून बाप्पाचे दागिने माळा, हातातली कडी, मुकुट वगैरे बनवले. जिथे गरज वाटेल तिथे सुई किंवा चाकू वापरून नक्षी तयार केली. आणि हलक्या हाताने चिकटवून दिले. एम सील स्वत:च एक सिलण्ट आहे त्यामुळे ते चिकटवण्यासाठी फ़ेव्हीकोल किंवा दुसरे काही वापरण्याची गरज नसते. बापाचे सगळे काम पूर्ण झाल्यावर खालच्या बाजूला एका रिकाम्या पाकळीवर उंदिरमामा आणि मोदकपात्र ठेवले. सगळे एम सील चे मातीकाम सुकायला एक पूर्ण दिवस लागतो.
हा गणपतीबाप्पा दुसऱ्या दिवशी कडकडीत वाळल्यावर आवडत्या रंगांनी रंगवला. रंगावर ग्लॉसी फ़िनिशींग येण्यासाठी रेझिन चा एक कोट दिला.